पालघर - नालासोपाऱ्यात अतिशय प्रसिद्ध अशा कळंब समुद्रात पाचजण बुडाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. तसेच वसई पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनारी काही व्यक्ती समुद्रामध्ये होळी साजरी करण्यासाठी गेल्या असता त्यामधील ५ व्यक्तींचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण वसईतील गोकुळ पार्क येथे राहणारे आहेत.
घटना कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी उपस्थित झाले असून अद्याप शोधकार्य सुरू आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलास कळविण्यात आले असल्याचे पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्याकडून माहिती मिळाली आहे. तसेच नालासोपाऱ्यात कळंब समुद्रात बुडालेल्या पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून चार बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.
अर्नाळा समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे -
1) निशा कमलेश मौर्या वय 36 वर्ष रा. 07, 202 गोकुळ पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम.
2) प्रशांत कमलेश मौर्य (17) राहणारे - 07, 202 गोकुळ पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम
3) प्रिया कमलेश मौर्य (19) राहणारे - 07, 202 गोकुळ पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम
4) कंचन मुकेश गुप्ता (35) राहणार - 1/1, गोकुळ पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम
5) शितल दिनेश गुप्ता (32) राहणारी - 1/1गोकुळ पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम