नवी दिल्ली - देशभरात कुठेही मेडिकलसाठी अॅडमिशन घेण्यासाठी नीटची (NEET) परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होणं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तारेवरची कसरत असते. यातच कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन देण्याच्या बहाण्याने ठगांनी लाखो रुपयांना चुना लावल्याची घटना समोर आली आहे. यासाठी ठगांजवळ बोगस ओळखपत्राचा वापर केला आहे.
नुकतेच एका तक्रारदाराने याबाबत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली असून मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन करून देण्यासाठी ७० लाख रुपये मागितले. मात्र, पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराने ५८ लाख रुपये ठगांनी घेतले आणि विचारपूस कारण्यासाठी तक्रारदाराने पैसे दिलेल्या इसमांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांनी तक्रारदाराच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. नीटची परीक्षा मेडिकलच्या अॅडमिशनकरिता अनिवार्य असूनही पैसे भरून दुसऱ्या मार्गाने अॅडमिशन घेणाऱ्यास लाखो रुपये गमवावे लागले आहेत.