प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यासह ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 07:38 PM2020-10-29T19:38:42+5:302020-10-29T19:38:47+5:30
Crime News: चेणे गावच्या हद्दीतील एका गोदामात दोन वाहना मधून गुटख्याचा साठा आणला जाणार असल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - काशिमीरा पोलिसांनी चेणे गावाच्या हद्दीतील एका गोदामात ठेवण्यासाठी आणला गेलेला ४९ लाखांचा गुटखा जप्त केला आहे . सदर गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने देखील पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले .
चेणे गावच्या हद्दीतील एका गोदामात दोन वाहना मधून गुटख्याचा साठा आणला जाणार असल्याची माहिती
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे यांना मिळाली . सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप आणि वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शना खाली भामरे व पोलीस पथकाने मंगळवारी कारवाई केली .
या प्रकरणी जाफर हुसेन अक्रमअली खान ( २३ ) रा. मुन्शी कंपाउंड , काशिमीरा आणि सुदाम आनंदराव जमरे ( २४) व नवनाथ सुभाषराव बारसे ( २४) दोघे हि रा. पुरंदा , वसमत, हिंगोली या तिघांना त्यांच्या कडील आयशर कंटेनर व महेंद्रा पिकअप हि दोन वाहनांसह ताब्यात घेऊन ४९ लाख १७ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे . जप्त गुटखा व वाहनं मिळून ५९ लाख १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी सांगितले . बंदी असलेल्या गुटख्याची शहरात खुलेआम विक्री आणि तस्करी होत असल्याचे प्रकार चाल असतानाच गुटख्याची गोदामे चर्चेचा विषय ठरली आहेत .