अफवा, धार्मिक भावना भडकविणाऱ्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ६४३ गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:18 AM2020-09-23T07:18:00+5:302020-09-23T07:18:09+5:30
फेसबुकचा सर्वाधिक वापर; ३०३ आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्टÑ सायबरकडून गेल्या काही दिवसांत राज्यभर अफवा, तसेच धार्मिक भावना भडकविणाºया पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकूण ६४३ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ३९१ गुन्हे हे द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी आहेत.
अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार करणे, दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी फेसबुकचा सर्वाधिक आधार घेतला गेल्याचे यातून समोर आले आहे. दाखल गुन्ह्यांपैकी २७७ गुन्हे फेसबुकवरून शेअर केलेल्या मजकुराशी संबंधित आहेत.
त्या खालोखाल व्हॉट्सअॅपवरून अफवा किंवा चुकीची माहिती पसरवल्यासंबंधी २३४ प्रकरणे दाखल आहेत.
अफवा, धार्मिक भावना भडकविणाºया १३० पोस्ट विविध समाजमाध्यमांवरून शेअर करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ३०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.