माणगावातील ढाळगाव येथील घरातून ९४५ डिटोनेटर्स आणि ४६ जिलेटीन काड्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 07:47 PM2018-09-04T19:47:31+5:302018-09-04T19:47:52+5:30
बेकायदेशीरपणे स्फोटके साठा करून ती बाळगल्याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. त्याचा अन्य कुठे वापर केला जाणार होता याची पोलीस माहिती जमा करत आहेत.
मुंबई- रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील ढाळगाव येथे एका घरात पोलिसांनी छापा टाकून ९४५ डिटोनेटर्स आणि ४६ जिलेटीन कांड्या हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी नूर महमद हुमर जाहीर काझी याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे स्फोटके साठा करून ती बाळगल्याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. त्याचा अन्य कुठे वापर केला जाणार होता याची पोलीस माहिती जमा करत आहेत.
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी माणगाव ढालघर फाट्याजवळील स्फोटकांच्या साठ्याबाबत बोलताना चार-पाच दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील एक आदिवासी मच्छिमार स्फोटक पदार्थ हाताळताना झालेल्या एक आदिवासी जखमी झाला होता. पाण्यात मच्छिमारी करताना आदिवासी मच्छिमार जखमी कसा झाला, याची चौकशी करीत असताना पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली असे सांगितले.