लॉजमध्ये घुसून अल्पवयीन विद्यार्थ्याची चाकूने वार भोसकून हत्या, तीन जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 09:05 PM2022-04-03T21:05:42+5:302022-04-03T21:21:54+5:30

A minor student was stabbed : पोलिसांनी मृताच्या खोलीतून चाकू आणि रक्ताने माखलेले कापड जप्त केले आहे.

A minor student was stabbed to death in a lodge, three arrested | लॉजमध्ये घुसून अल्पवयीन विद्यार्थ्याची चाकूने वार भोसकून हत्या, तीन जण ताब्यात

लॉजमध्ये घुसून अल्पवयीन विद्यार्थ्याची चाकूने वार भोसकून हत्या, तीन जण ताब्यात

Next

पाटणा - बिहारची राजधानी पाटण्यात गुन्हेगार अजूनही निर्भय आहेत. त्यांना पोलिसांचा भय उरलेला नाही. येथील बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामकृष्ण कॉलनीत असलेल्या माँ सरस्वती निवास नावाच्या लॉजमध्ये घुसून एका अल्पवयीन विद्यार्थ्याची अज्ञात गुन्हेगारांनी चाकूने वार करून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा केल्यानंतर मारेकऱ्यांनी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. मृताच्या नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. एफएसएल टीमनेही घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी मृताच्या खोलीतून चाकू आणि रक्ताने माखलेले कापड जप्त केले आहे.

समस्तीपूर जिल्ह्यातील सिमराहा खानपूर येथील रहिवासी सुनील कुमार राय यांचा १७ वर्षीय मुलगा राहुल कुमार असे मृताचे नाव आहे. राहुल गेल्या एक वर्षापासून येथे राहून आयआयटी-जेईई स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्या कारणासाठी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राहुलच्या कुटुंबीयांनीही त्याच्या हत्येमागील कारण सांगण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.



या घटनेबाबत मृताचा चुलत भाऊ लव कुमार आणि त्याचे मामा सुजित कुमार यांनी सांगितले की, राहुलचा त्याच्या गावातील राहत्या घरातील आर्यनसोबत वाद होता. या वादामुळे त्याने आर्यनला खोली रिकामी करण्यास सांगितले. त्याने सांगितले की 31 मार्च रोजी आर्यनने खोली रिकामी केली होती आणि तीन दिवसांनंतर राहुलची लॉजमध्ये घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी राहुलच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे. या हत्येला दुजोरा देताना बहादूरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी रिझवान अहमद खान यांनी लवकरच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: A minor student was stabbed to death in a lodge, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.