पालघरची पुनरावृत्ती टळली, मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:19 AM2022-09-14T10:19:58+5:302022-09-14T10:26:36+5:30
Crime News: पालघरमधील घटनेची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली असून, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये मुलं चोरणारी टोळी समजून चार साधूंना मारहाण करण्यात आली. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
सांगली - कोरोनाकाळात पालघरमध्ये मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत त्या साधूंचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली असून, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये मुलं चोरणारी टोळी समजून चार साधूंना मारहाण करण्यात आली. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, गैरसमजामधून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासामधून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील चार साधू हे कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, जत तालुक्यातील एका गावामध्ये त्यांनी एका लहान मुलाला पत्ता विचारला. ही बाब तिथे असलेल्या काही लोकांनी पाहिली. त्यांना हे साधू म्हणजे मुलं चोरणारी टोळी आहे, असे वाटले. त्यांनी या साधूंना मारहाण केली.
दरम्यान, पोलिसांनी या साधूंकडील कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासली असता ते साधू असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांना गैसरमजामधून मारहाण झाल्याचे समोर आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.