Facebook वर मैत्री, लग्न करून युवती आली घरी; त्यानंतर 'जे' केले त्याने युवक शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:40 AM2023-05-25T09:40:07+5:302023-05-25T09:40:59+5:30

युवतीने युवकाच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावला. त्यानंतर युवकाने तिच्या घरच्यांना सांगितले

A youth married a Facebook friend, after 10 months she ran away from home with cash and jewellery | Facebook वर मैत्री, लग्न करून युवती आली घरी; त्यानंतर 'जे' केले त्याने युवक शॉक

Facebook वर मैत्री, लग्न करून युवती आली घरी; त्यानंतर 'जे' केले त्याने युवक शॉक

googlenewsNext

हरियाणा - सध्या सोशल मीडियाच्या जगतात अनेकदा अनोळखी लोक एकमेकांशी जोडले जातात. मात्र हरियाणात घडलेल्या एका अजब घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी एका युवतीने फेसबुकवरून युवकाशी मैत्री केली. त्यानंतर या मुलीने त्या मुलासोबत लग्न करून पत्नी बनून त्याच्या घरी आली. १० महिने युवतीने युवकाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र त्यानंतर तिने असा कारनामा केला की युवकासह त्याच्या घरच्यांनी डोक्यावर हात मारला. 

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील ही घटना आहे. जिथे एक युवती घरातील रोकड, ज्वेलरी घेऊन पसार झाली आहे. या आरोपी युवतीविरोधात पीडित युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युवकाने तक्रारीत म्हटलंय की, १० महिन्यापूर्वी त्याची फेसबुकवरून एका युवतीशी ओळख झाली होती. एकमेकांसोबत असलेल्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. युवतीने युवकाला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर युवती युवकाच्या घरी आली. 

युवतीने युवकाच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावला. त्यानंतर युवकाने तिच्या घरच्यांना सांगितले. युवतीच्या आईनेही युवकाला मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव दिला. लग्नाला सगळ्यांनी होकार दिल्यानंतर सहमतीने युवती युवकासोबत राहू लागली. १-२ महिन्यात युवकाने युवतीसोबत कोर्ट मॅरेज केले. युवक-युवतीचा संसार सुरू झाला, तिचे नातेवाईक अधूनमधून येत राहिले. सगळं काही सुरळीत चालले होते. परंतु अचानक एकेदिवशी युवती फरार झाली. 

युवतीने घरातून जाताना ८५ हजार रुपये रोकड, सोन्याच्या २ अंगठ्या, मंगळसूत्र आणि इतर सामान घेऊन गेली. युवकाने युवतीच्या आई वडिलांशी संपर्क साधला परंतु ते कधी वृदांवन तर कधी हरिद्वारमध्ये असल्याचे सांगत टाळाटाळ करू लागले. अखेर युवक आणि त्याच्या घरच्यांनी कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली. युवकाने युवतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याचा पोलीस तपास करत असून मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

Web Title: A youth married a Facebook friend, after 10 months she ran away from home with cash and jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.