Accident : ५ मुलांसह रेल्वे ट्रॅकवर बसली होती रेल्वे गेटमॅनची पत्नी; ट्रेन दिसताच दोघं हात सोडून गेले अन् मग.....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 09:14 PM2021-05-10T21:14:22+5:302021-05-10T21:19:05+5:30
Accident : या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.
रेल्वेमार्गावर होणारे अपघात काही नवीन नाहीत. पण नेहमी एखाद्या चुकीमुळे निष्पाप लोकांना जीव गेल्यानं प्रत्येक घटना विचार करण्यास प्रवृत्त करते. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत एक महिला आणि तिच्या लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.
राजस्थानच्या दौस जिल्ह्यातील मंडावरमध्ये एका महिलेनं हे पाऊल उचललं आहे. या घटनेदरम्यान आग्रा ते बांदीकुईकडे जात असलेल्या मालगाडीला धडकल्यामुळे महिला आणि तिच्या ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागचं कारण घरातील भांडणं असल्याचं सांगितलं जात आहे.
ही महिला पहिल्या पासूनच आपल्या दारू पित असलेल्या पतीमुळे हैराण झाली होती. सुचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिला आणि ३ मुलांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. वडील फरार झाल्यानंतर उरलेल्या २ मुलांची देखभाल कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ट्रेनला येताना पाहून या मुलीनं हात सोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही २ मुलं जीव वाचवण्यात यशस्वी ठरली. या महिलेचा पती रेल्वे गॅटमन असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पोलिस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.