वाराणसीत थरार! रस्त्याशेजारी झोपलेल्या 5 जणांना SUV ने चिरडले

By हेमंत बावकर | Published: October 18, 2020 11:45 AM2020-10-18T11:45:51+5:302020-10-18T11:50:30+5:30

Accident In Varanasi : मलिन बस्तीमध्ये रात्री उशिरा जोरदार आवाज झाला, यामुळे आजुबाजुच्या परिसरातील सारेच जागे झाले.

Accident in Varanasi! Five people sleeping on the side of the road were crushed by the SUV | वाराणसीत थरार! रस्त्याशेजारी झोपलेल्या 5 जणांना SUV ने चिरडले

वाराणसीत थरार! रस्त्याशेजारी झोपलेल्या 5 जणांना SUV ने चिरडले

Next

वाराणसीच्या भेलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील पद्मश्री चौकाजवळ रस्त्याशेजारी झोपलेल्या मलिन वस्तीच्या लोकांना एका वेगाने येणाऱ्या एसयुव्ही कारने चिरडले. यामध्ये रस्त्याशेजारी झोपलेले 5 लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तसेच काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 


या अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी चालकाला मारहाण केली. तसेच कारची देखील तोडफोड केली. खूप वेळ समजूत घातल्यानंतर त्यांनी चालकाला आणि कारला पोलिसांच्या ताब्यात दिले. 
मलिन बस्तीमध्ये रात्री उशिरा जोरदार आवाज झाला, यामुळे आजुबाजुच्या परिसरातील सारेच जागे झाले. एसयुव्हीने रस्त्य़ाशेजारी झोपलेल्या लोकांना चिरडत कठड्यावर आदळली. हा अपघात एवढा मोठा होता की एसयुव्हीच्या पुढील बोनट आणि आतील भाग पूर्णपणे उध्वस्त झाला होता. 


पाच जखमींमध्ये तीन महिला आणि एक बालक व एक पुरुष आहे. जखमी झाल्यानंतर लगेचच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मलिन बस्तीच्या लोकांनी अपघात झाल्यानंतर कारच्या चालकाला मारहाण केली. तसेच कारच्याही काच फोडल्या. 


अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, लोक चालकाला त्यांच्या हवाली करण्यास तयार नव्हते. अखेर अधिकाऱ्यांनी संतप्त लोकांची समजूत घातली तेव्हा हे लोक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार झाले. पोलिसांनी आरोपी चालकाला कडक शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा या लोकांचा राग शांत झाला.
 

Web Title: Accident in Varanasi! Five people sleeping on the side of the road were crushed by the SUV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.