अमरावती कारागृहातून पसार झालेल्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 07:57 PM2021-09-11T19:57:51+5:302021-09-11T19:58:16+5:30
Crime News : आरोपी सांगवामेळ येथे असल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांना मिळाली असता सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली.
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्या सांगवामेळ येथील आरोपी खुनाच्या गुन्ह्यात अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ३१ अॉगष्ट रोजी पळाला होता. या आरोपीस ग्रामीण पोलीसांनी ११ सप्टेंबर रोजी शिताफीने अटक करुन फेजरपूरा पोलीसांच्या हवाली केले.
सांगवामेळ येथील संतोष श्रीराम सोळंके (३०) हा ३० जुन २०१४ पासून अमरावती येथील खुल्या कारागृह खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तो ३१ अॉगष्ट २०२१ रोजी कारागृहातून पळून गेला होता. यासंदर्भात तुरंग रक्षक नारायण रामचंद्र चवरे यांनी फेजरपूरा पोलीस स्टेशन अमरावती येथे तक्रार दाखल केली होती. कारागृहातून पळून आलेला आरोपी सांगवामेळ येथे असल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांना मिळाली असता सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड सुभाष उघडे, हेड कॉन्स्टेबल संजय शिंगणे, हेड कॉन्स्टेबल संजय खंडारे, पोलीस शिपाई गजानन सयाम, होमगार्ड सैनिक नितीन भगत, निलेश दहीकर यांनी पारपडली. कारवाई करुन सदर आरोपीस फेजरपूरा पोलीसांच्या सुपूर्द केले.