श्री रामजन्मभूमी ट्रस्टची बनावट वेबसाइट बनवून घातला गंडा, पोलिसांच्या जाळ्यात आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 08:32 PM2022-05-02T20:32:38+5:302022-05-02T20:34:07+5:30
Cyber Crime Case :अविनाश बहुखंडी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील सी-20 इंद्रपार्क नजफगड येथील रहिवासी आहे.
अयोध्या - दिल्लीतील एका तरुणाने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नावाने बनावट वेबसाईट तयार केली होती. या तरुणाला अटक करण्यात सायबर क्राईम पोलिसांना यश आले आहे. अविनाश बहुखंडी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील सी-20 इंद्रपार्क नजफगड येथील रहिवासी आहे.
सायबर क्राइम स्टेशनचे प्रभारी चंद्रभान यादव यांनी सांगितले की, 2020 मध्ये ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता, ज्याचा तपास या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वेबसाईटच्या तपासणीत अविनाशचा ई-मेल, फोन आणि खाते क्रमांक उघडकीस आला.
तो पूर्वी दिल्लीतील उत्तमनगर येथे राहत होता. टीम तिथे पोहोचल्यावर अविनाश घर विकून निघून गेल्याचे समजले. यानंतर दिल्लीतील नजफगडमध्ये तो असल्याचं आढळून आलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलीस पथकाने आरोपीला अटक केली. ट्रस्टच्या बनावट साईटच्या मदतीने आरोपींची फसवणूक करणाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे, याचा अंदाज पोलिसांना लावता आलेला नाही. तपासादरम्यान आरोपींच्या चौकशीत याबाबत स्पष्टता होणार आहे.
आत्महत्येपूर्वी पीडितेने कोणाला केला होता कॉल, काय झालं बोलणं... कॉल डिटेल्स उघड
एफआयआरचे स्टेटस ऑनलाइन पाहायचे
अविनाशने बनावट वेबसाईट तयार करून फसवणुकीचा कला धंदा करायचा. त्याचा गुन्हा पकडला जाण्याची भीती होती, म्हणून तो दररोज अयोध्येत ऑनलाईन अपलोड केलेल्या एफआयआरची स्थिती तपासत असे. 2020 मध्ये गुन्हा दाखल होताच त्याने वेबसाईटवरून लोगो आणि फोटो काढून टाकला होता. मात्र, तरीदेखील सायबर क्राइम पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.