भिवंडीत चार बोगस डॉक्टरांवर कारवाई

By नितीन पंडित | Published: February 18, 2023 07:51 PM2023-02-18T19:51:36+5:302023-02-18T19:51:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी:दि.१८- भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुटला असून मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंजुरफाटा व नारपोली परिसरात शुक्रवारी धाड ...

Action taken against four bogus doctors in Bhiwandi | भिवंडीत चार बोगस डॉक्टरांवर कारवाई

भिवंडीत चार बोगस डॉक्टरांवर कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी:दि.१८- भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुटला असून मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंजुरफाटा व नारपोली परिसरात शुक्रवारी धाड टाकून चार बोगस डॉक्टरांवर नारपोली पोलीस गुन्हा दाखल केला आहे.या चारही बोगस डॉक्टरांना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

हरीशंकर पटेल रा.भोईर बिल्डिंग,नारपोली, रुद्रण रणजीत राय रा. न्यू हनुमान कंपाऊंड,एकता नगर,नारपोली, राजेंद्र प्रसाद हंसराज पटेल रा.रामनगर,अंजुर फाटा,राधेश्याम कालिका चौधरी रामनगर अंजुर फाटा असे कारवाई करण्यात आलेल्या चार बोगस डॉक्टरांची नावे आहेत.या चौघांकडे वैद्यकीय व्यवसायाचे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना हे चारही बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती व तक्रारी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयवंत धुळे यांच्याकडे आल्या होत्या.डॉ.धुळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नारपोली पोलिसांना सोबत घेऊन शुक्रवारी या चारही बोगस डॉक्टरांवर धाड टाकून या चौघानवरही कारवाई केली असून नारपोली पोलीस ठाण्यात विविध कालमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे या चौघांपैकी राधेश्याम चौधरी याच्याकडे ग्रामीण भागात नॅचरोपेथी, ॲक्युपंचर व योगा करण्याची पदवी असून त्या प्रमाणपत्राच्या आधारे चौधरी हा शहरी भागात वैद्यकीय व्यावसाय करत असल्याचे डॉ धुळे यांच्या निदर्शनात आले. भिवंडीत अशाच प्रकारे बोगस प्रमाणपत्र व इतर बोगस प्रमाणपत्र दाखवून वैद्यकीय व्यवसाय करणारे अनेक बोगस डॉक्टर शहरात नागरिकांवर उपचार करत आहेत, शहरातील बोगस डॉक्टरांवर यापुढे अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयवंत धुळे यांनी दिली आहे.

Web Title: Action taken against four bogus doctors in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर