मुंबई - TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला गेल्या गुरुवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने एजाज खानची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा या व्हिडीओमध्ये उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. एजाजने यापैकी एका व्यक्तीचं समर्थन करत टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत त्याने मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर एजाज खानला अटक करण्यात आली होती.