लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:55 PM2020-05-16T21:55:45+5:302020-05-16T21:59:37+5:30
लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झाल्याने आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने मनमीत ग्रेवाल मानसिक तणावाखाली होता.
नवी मुंबई - खारघर येथे फ्लॅटमध्ये टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झाल्याने आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने मनमीत ग्रेवाल मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे मनमीत ग्रेवाल याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. खारघर सेक्टर 36 मध्ये राहणाऱ्या मनमित ग्रेवाल या टीवी कलाकाराने कर्जबाजारीपणामुळे शुक्रवारी आपल्या भाड्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आपली पत्नीसोबत राहणार मनमित अनेक दिवसापासून काम न मिळाल्यामुळे डिप्रेशनमध्ये होता.लॉकडाउनच्या काळात परिस्थिती आणखी बिकट बनली. त्यातच कर्ज घेतले असल्याने मनमित मानसिक तणावात गेल्याने राहत्या घरीच पत्नीच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही मनजीतच्या पत्नीच्या मदतीला आला नाही.गळफास घेतल्यावर मनजीतची पत्नी शेजा-यांना मदतीसाठी बोलवत होती.मात्र कोणीही पुढे आले नाही. दरम्यान खारघर पोलीसांची टीम घटनास्थळावर आल्यावर मनजीतचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी हलविण्यात आले .
नवी मुंबई - लॉकडाउनमुळे कर्जात बुडालेल्या टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या, घरात घेतला गळफास https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2020
अभिनेता मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घऱातच गळफास घेत पत्नीच्या ओढणीने गळफास लावून घेतला. मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ आणि अॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत अभिनय केला होता.
Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला
Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड
भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा