मुलीच्या मृत्यूमुळे रहिवाशी आक्रमक; विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 08:53 PM2019-11-20T20:53:46+5:302019-11-20T20:57:52+5:30

डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक कोसळून १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू'; टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा

Aggression resident due to girl's death at tilak nagar police station; Filed case against developer | मुलीच्या मृत्यूमुळे रहिवाशी आक्रमक; विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल 

मुलीच्या मृत्यूमुळे रहिवाशी आक्रमक; विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देसिमेंटचा ठोकळा डोक्यावर पडल्याने प्रतिभा शिंगारे (१०) या मुलीचा मंगळवारी मृत्यू झाला. टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. या प्रकरणी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक कोसळून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चेंबूरमध्ये घडली. या प्रकरणी संतप्त रहिवाशांनी बुधवारी विकासकाविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले. टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. या प्रकरणी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेंबूर येथील अमर महल परिसरातील पंचशीलनगरमध्ये इमारतीवरून सिमेंटचा ठोकळा डोक्यावर पडल्याने प्रतिभा शिंगारे (१०) या मुलीचा मंगळवारी मृत्यू झाला. पंचशीलनगर येथील एसआरए इमारतीच्या ए विंगमध्ये १४व्या मजल्यावर प्रतिभा तिच्या आत्याकडे राहत होती. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीत प्रवेश करत असताना, वरून अचानक तिच्या डोक्यात सिमेंटचा ठोकळा पडला व ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी साडे ९च्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रतिभाच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. रहिवाशांना तिच्या मृत्यूबाबत समजताच त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. विकासकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीवर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.

याविरुद्ध मुलीच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी बुधवारी विकासकाविरुद्ध कारवाईची मागणी करत आंदोलन छेडले. पंचशीलनगर येथील एसआरएच्या अर्धवट इमारतीमध्ये तेथील विकासकाने कुठलेही सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे १० वर्षांच्या प्रतिभाला जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सुरुवातीला प्रतिभाची आई छब्बू यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात कलम ३३८ खाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर, कुटुंबीयांच्या मागणीनंतर, विकासकासह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी दुजोरा दिला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले.


 

Web Title: Aggression resident due to girl's death at tilak nagar police station; Filed case against developer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.