अक्षय कुमारचा माॅर्फ व्हिडीओ यू ट्यूबवर; सायबर क्राईम पोलिसात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 06:56 PM2018-10-08T18:56:34+5:302018-10-08T18:58:02+5:30

नेमकं याच व्हिडीओतील प्रसंगाशी समाजकंटकांनी तनुश्री दत्ताच्या प्रकरण जोडले आणि विचारण्यात आलेला प्रश्न कट करून त्याऐवजी तनुश्री दत्ता प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर अक्षयने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर काही समाजकंटकांनी व्हायरल केला.  

Akshay Kumar's Morph video on YouTube; complaint at Cyber ​​Crime Police | अक्षय कुमारचा माॅर्फ व्हिडीओ यू ट्यूबवर; सायबर क्राईम पोलिसात धाव 

अक्षय कुमारचा माॅर्फ व्हिडीओ यू ट्यूबवर; सायबर क्राईम पोलिसात धाव 

googlenewsNext

मुंबई - यू ट्यूबवरील वादग्रस्त व्हिडीओमुळे अभिनेेता अक्षय कुमारने सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अक्षय कुमारचा व्हिडीओ कट पेस्ट करून चुकीच्या पद्धतीने यू ट्यूबवर टाकला असल्याचं अक्षय कुमारचं म्हणणं अाहे. हे. याप्रकरणी अक्षयने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त पत्रकारांशी चर्चा केली होती. त्यावेळी एका पत्रकाराने अभिनेत्री करीना कपूरसोबत येणाऱ्या चित्रपटाविषयी प्रश्न विचारला. यावेळी अक्षयने त्या चित्रपटाबद्दल उत्तर देण्याची ही योग्य वेळ नसून त्याबाबत बोलण्यास नकार दिला. नेमकं याच व्हिडीओतील प्रसंगाशी समाजकंटकांनी तनुश्री दत्ताच्या प्रकरण जोडले आणि विचारण्यात आलेला प्रश्न कट करून त्याऐवजी तनुश्री दत्ता प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर अक्षयने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर काही समाजकंटकांनी व्हायरल केला.  

काही तासातच हा व्हिडीओ इतका वायरल झाला या व्हिडीओबाबत टीकांचा पाऊस पडला आहे. ही बाब अक्षय कुमारच्या निदर्शनास आल्यानंंतर तो व्हिडीओ कट-पेस्ट करून चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आल्याचं त्याने सांगितलं. अक्षयने स्वीय सहाय्यकाला या प्रकरणी सायबर पोलिस तक्रार करण्यासाठी पाठवले.  समाजकंटक व्यक्तींकडून हा व्हिडीओ मॉर्फ करून प्रसारित करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Akshay Kumar's Morph video on YouTube; complaint at Cyber ​​Crime Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.