Andhra Pradesh: रेल्वे स्टेशनवर गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलांसमोर पतीला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:52 PM2022-05-02T17:52:01+5:302022-05-02T17:52:23+5:30

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात एका गरोदर महिलेचे रेल्वे स्टेशनवरुन अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Andhra Pradesh: Pregnant woman gang-raped at railway station, husband beaten in front of children | Andhra Pradesh: रेल्वे स्टेशनवर गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलांसमोर पतीला बेदम मारहाण

Andhra Pradesh: रेल्वे स्टेशनवर गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलांसमोर पतीला बेदम मारहाण

Next

बापटाला: आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात एका गरोदर महिलेचे रेल्वे स्टेशनवरुन अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, त्यांच्या दोन मुलांसमोर पतीला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका अल्पवयीनासह तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 376(डी), कलम 394 आणि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बस न मिळाल्याने स्टेशनवर झोपले
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील यारागोंडा भागात राहणारी एक महिला पती आणि दोन मुलांसह रात्री उशिरा रेपल्ले रेल्वे स्थानकावर उतरली, परंतु त्यांना स्टेशनवरुन जाण्यासाठी बस मिळाली नाही. यानंतर संपूर्ण कुटुंब रेल्वे स्टेशनवर थांबले आणि सर्वजण तिथेच झोपले.

दारुच्या नशेत तिघांनी केले कृत्य
रात्री स्टेशनवर झोपलेल्या कुटुंबाजवळ नशेत तिघेजण आले आणि त्यांनी महिलेचे अपहरण केले. यावेळी आरोपींनी महिलेच्या पतीलाही दोरीने बांधून बेदम मारहाण केली. महिलेने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिघांनी तिला ओढत नेले आणि झुडपामध्ये बलात्कार केला. पतीने घंटा वाजवून रेल्वे पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. अखेर महिला स्टेशन जवळच्या झुडपात जखमी अवस्थेत आढळून आली.

Web Title: Andhra Pradesh: Pregnant woman gang-raped at railway station, husband beaten in front of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.