संतापजनक! बस चालकाचा प्रवासी महिलेवर बलात्कार; कात्रजमधील घटनेनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:57 AM2022-06-13T11:57:00+5:302022-06-13T14:49:49+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ वर्षे वयाची असून वाशीम जिल्ह्यातील आहे.

Annoying! Bus driver rapes female passenger; Excitement over the incident in Katraj | संतापजनक! बस चालकाचा प्रवासी महिलेवर बलात्कार; कात्रजमधील घटनेनं खळबळ

संतापजनक! बस चालकाचा प्रवासी महिलेवर बलात्कार; कात्रजमधील घटनेनं खळबळ

googlenewsNext

पुणे- पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका २१ वर्षीय महिलेचे एका खासगी बसमधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सदर महिला बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात राहण्यासाठी ते खोली शोधत होते. यावेळी संबंधित आरोपीने या दाम्पत्याला बसमध्येच झोपण्यास सांगितले. त्यानंतर बस अचानक सुरू करून कात्रज परिसरात घेऊन जात महिलेवर बलात्कार केला. 

सदरप्रकरणी चालक नवनाथ शिवाजी भोंग (वय ३८) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत २१ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ वर्षे वयाची असून वाशीम जिल्ह्यातील आहे. ही महिला पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात दोघे राहण्यासाठी खोली शोधत होते. रात्र झाल्यामुळे आरोपी भोंग याने या दाम्पत्याला बसमध्ये झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी बसमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेले. 

पती वॉशरूमला गेल्याचे पाहून आरोपी भोंग याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा पती तिला शोधत होता. पण, बस व पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. त्यांनतर पोलिसांनी शोध घेत चालकाला अटक केली.

Web Title: Annoying! Bus driver rapes female passenger; Excitement over the incident in Katraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.