Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात आणखी एक मृतदेह; मुंब्रा रेतीबंदर परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:43 AM2021-03-20T11:43:09+5:302021-03-20T11:53:37+5:30
Mansukh Hiren: मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या परिसरात दुसरा मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. आता त्याच परिसरात आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. (Another body in the area where Mansukh Hiren's body was found.)
मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या परिसरात दुसरा मृतदेह सापडल्याने पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज सकाळी 11.10 च्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर येथील रहिवासी सलीम अब्दुल शेख (वय-48) यांचा मृतदेह सापडला आहे. मुंब्रा पोलीस, पालिका आणि फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
#UPDATE Maharashtra: The body has been identified to be that of a 48-year-old man, Shaikh Saleem Abdul - resident of Retibunder, Mumbra. The body has been handed over to Police officials.
— ANI (@ANI) March 20, 2021
स्फोटक प्रकरण समोर येताच अवघ्या काही दिवसांत मनसुख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मनसुख हे पाण्यात पडले त्यावेळी काही वेळ जिवंत होते. त्यांच्या फुफ्फुसात खाडीचे पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली. हा अहवाल एटीएसकडे साेपवण्यात आल्याचे समजते. त्याआधी मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी समोर आलेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या फुफ्फुसात जास्त पाणी आढळून आलेले नाही, अशी माहिती समाेर आली होती. पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास फुफ्फुसात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय कायम आहे.