मुरुम चोरी प्रकरणात ॲपकॉनसच्या व्यवस्थापकाला दोन दिवसाची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:52 PM2019-11-13T22:52:13+5:302019-11-13T22:52:41+5:30
सम्रूद्धी महामार्गाच्या बांधकामाकरिता अंदाजे कोट्यावधी रुपयांचा माती व मुरूम चोरी प्रकरणी आरोपी अफकानस कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुमार बच्चू सिंह यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
वर्धा: तालुक्यांतील मौजा केळझर व गणेशपुर येथील सम्रूद्धी महामार्गाच्या बांधकामाकरिता अंदाजे कोट्यावधी रुपयांचा माती व मुरूम चोरी प्रकरणी आरोपी अफकानस कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुमार बच्चू सिंह यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
सेलु तालुक्यातील मौजा केळझर येथील शेत सर्वे नंबर 612/1, 612/2, 613/1 व 613/2 मधिल बारा कोटी दहा लाख अकरा हजार दोणसे अठ्ठेचाळीस रूपयांची माती व मुरूम चोरी प्रकरणी संम्मती शिवाय उत्खनन केल्यामुळे में. कोझी प्रापर्टी प्रायव्हेट लिमिटेड चे स्वाक्षरी करणार निलेश कुमार यांनी २२ आँगस्ट रोजी वरिल आरोपींविरुद्ध तक्रार पोलिस स्टेशन सेलू येथे दाखल केली होती.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवीच्या कलम 379, 427, 447,411, व 120 (ब) 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मौजा गणेशपुर येथील शेत सर्वे क्रमांक 45, 47, 48, 57, 58, 59 व 61 मधील अवैधरीत्या उत्खनन करून चोरी गेलेला माती व मुरूमची महसूल विभागाकडून नेमका किती रूपयांचा मुरुम व माती नेन्यात आली याची मोजनी झालेली नाही. सदर चोरी प्रकरणात दोन आरोपी पैकी अँपकाँन इन्फ्रास्ट्रक्चर लि. चे मालक अनिल कुमार यांना सदर प्रकरणातील तपासी अधिकारी ठाणेदार सुनिल गाडे यांनी अटक केले.
सदर आरोपिस सेलू पोलिस यांनी अधिक सखोल चौकशी करण्या करिता म्हणून तारिख सोळा पर्यंत पोलिस कोठडी ची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुने युक्तीवाद ऐकून आरोपी अनिल कुमार यास १५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली. शासनातर्फे सरकारी शासकीय अभियोक्ता अनंत ठाकरे यांनी बाजू मांडली.
अखेर आरोपिस व्हावे लागले समर्पित
सदर आरोपी अनिल कुमार यांनी अटक पुर्व जामिन मिळावी म्हणून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु आरोपि ने समर्पण करावे असे न्यायालयाने म्हटल्याने अखेर आरोपि ला पोलिसां समोर समर्पण व्हावे लागले.