सी हॉर्सची तस्करी करणाऱ्या अटक; आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 07:21 PM2019-03-08T19:21:33+5:302019-03-08T19:23:14+5:30

३० किलो वजनाचे हे जलचर मलेशियाला नेण्यात येत होते.

Arrest of sea Horse smugglers; Operations at international airport | सी हॉर्सची तस्करी करणाऱ्या अटक; आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई  

सी हॉर्सची तस्करी करणाऱ्या अटक; आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई  

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. सी हॉर्स या जलचराचा वापर सूप आणि औषधांमध्ये केला जातो. या प्रकरणी आणखी कोणाचा हात आहे का याचा माग सध्या काढला जात आहे.

मुंबई - मुंबईच्या कांदळवन संधारण घटकातर्फे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'सी हॉर्स' या प्रजातीच्या मृतावस्थेतील सुकवलेल्या जलचरांसह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ३० किलो वजनाचे हे जलचर मलेशियाला नेण्यात येत होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. 

सी हॉर्स या जलचराचा वापर सूप आणि औषधांमध्ये केला जातो. त्यासाठी ही तस्करी करण्यात येत होती. ही कारवाई कादंळवन विभागाचे उपवनसंरक्षक मकरंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत देशमुख व मयूर बोठे आणि व. र. पांडुळे यांच्या मदतीने करण्यात आली. आरोपीला सध्या ७ दिवसांची वनकोठडी मिळाली आहे. या प्रकरणी आणखी कोणाचा हात आहे का याचा माग सध्या काढला जात आहे.

Web Title: Arrest of sea Horse smugglers; Operations at international airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.