अल्पवयीन विद्यार्थींनीशी अश्लील चाळे करणारा शिक्षक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 09:34 PM2018-09-11T21:34:48+5:302018-09-11T21:35:11+5:30
पोलिसांनी भा.दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल करत लुईसला अटक केली आहे
मुंबई - विनोबा भावे नगर परिसरातील खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने ९ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी लुईस फर्नांडिस (वय ५४) वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात भा.दं. वि. कलम ३५४, ५०६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
कुर्ला परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी ९ वर्षीय मुलगी आरोपीकडे खासगी ट्युशनसाठी मागील अनेक दिवसांपासून जात होती. सोमवारी सकाळी १० वाजता ती नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली असताना. लुईसने संधी साधून तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणीने विरोध केला. वेळीच आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्यानंतर लुईसने तरुणीला याबाबत कुणालाही न सांगण्यास धमकावले. अन्यथा टु्यशनमधून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणामुळे घाबरलेली तरुणी विचित्र वागत होती. त्यामुळे पालकांनी तिला विश्वासात घेवून विचारपूस केल्यानंतर तरुणीने लुईसने केलेल्या अश्लील चाळ्यांबाबत माहिती तिने घरातल्यांना दिली. याप्रकरणी विनोबा भावे मार्ग पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा.दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल करत लुईसला अटक केली आहे.