मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या पोलिसाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:38 PM2020-05-05T14:38:02+5:302020-05-05T14:42:18+5:30
उत्तर प्रदेशच्या गाजीपूर पोलिसांनी या एएसआयला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोशल मीडियावर गोळ्या घालण्याची धमकी देणार्या एएसआयला उत्तर प्रदेश पोलिसांनीअटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाजीपूर पोलिसांनी या एएसआयला अटक केली आहे. एएसआयने 24 एप्रिल रोजी फेसबुकवर सीएम योगी आदित्यनाथ यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे.
Coronavirus : जे जे मार्ग पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, १२ पोलिसांना लागण
गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक
हंदवाडा येथे चकमक झालेल्या ठिकाणाहून चिनी बनावटीच्या रायफली हस्तगत
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाष्य केले होते
या प्रकरणाची माहिती देताना गाझीपूरचे एसपी डॉ. ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले की, तनवीर खान हा गाझीपूरच्या दिलदारनगर भागातील रहिवासी आहे आणि बिहारच्या नालंदा येथील पोलिस विभागात कॉन्स्टेबल म्हणून तैनात होता. असा आरोप केला जात आहे की, तनवीर खानने 24 एप्रिल रोजी आपल्या फेसबुक पेजवर रमजानमधील अजान प्रकरणात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरूद्ध टीका केली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांनी तक्रारीवरून कारवाई केली
उत्तर प्रदेश पोलिसांना तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या फेसबुक पोस्टची तपासणी केली असता आरोपी गाजीपूर येथील असल्याचे सिद्ध झाले.
आरोपीला नालंदा येथून अटक करण्यात आली
उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी तनवीर खानच्या शोधात नालंदा गाठले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. सोशल मीडियावर अशोभनीय भाष्य केल्याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर अनेक कलम लावले आणि सध्या या व्यक्तीला तुरूंगात पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की यूजर्सने सोशल मीडियावरील कोणत्याही भडकावू पोस्टपासून दूर रहावे. पोलीस धार्मिक भावना भडकवण्यासाठी, एखाद्याच्या सन्मान आणि अस्मितेविरूद्ध पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.