लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच हातात पडल्या बेड्या; होणाऱ्या बायकोनं 'त्याला' दाखवला पोलिसी इंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:45 PM2022-05-05T19:45:04+5:302022-05-05T19:56:44+5:30
लग्नाला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना काही महिला पोलिसाने तिच्या भावी पतीला अटक करून तुरुंगात टाकले आहे.
नवी दिल्ली - आसाममधील शिवसागर जिल्ह्यात एका महिला सब-इंस्पेक्टरने (Woman Sub-inspector) असे काम केले आहे, ज्याबद्दल तिचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. लग्नाला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना महिला पोलिसाने तिच्या भावी पतीला अटक करून तुरुंगात टाकले आहे. नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. जोनमाई राभा असं य़ा महिला सब इन्स्पेक्टरचं नाव असून तिने फसवणुकीच्या प्रकरणात स्वतःचा होणारा नवरा राणा पगाग याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणा पगागने लोकांना खोटी ओळख करून देऊन त्यांना नोकरी देण्याचे नाटक करून त्यांच्याकडून खूप पैसे उकळले होते. त्यानंतर आता जोनमाईने होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, राणाने ऑइल इंडिया लिमिटेडचा पीआर अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. तो लोकांची फसवणूक करत होता. ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांची त्याने कोट्यवधींची फसवणूक केली आहे.
आसामच्या नागाव जिल्ह्यात तैनात असलेल्या पोलीस सब इन्स्पेक्टरने फसवणुकीत माहीर असलेल्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याविरोधात एफआयआर नोंदवला आणि त्याला अटक करून नौगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार होते. आरोपींनी चतुराईने सब इन्स्पेक्टरलाही आपल्या जाळ्यात अडकवलं होतं.
आरोपीची जानेवारी 2021 मध्ये सब इन्स्पेक्टर जोनमाईशी भेट झाली होती, जेव्हा ती माजुली येथे तैनात होती. काही महिन्यांनंतर कुटुंबीयांच्या आशीर्वादाने दोघांचा साखरपुडा झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नौगावमध्ये पोस्ट केल्यानंतर जोनमाईला राणाला नोकरी नसल्याचा संशय आला. पण तिने विचारलं असता त्याने खोटं सांगितलं. कोणतीही नोकरी नाही, परंतु त्याने खोटं सांगितले की त्याची सिलचरमध्ये बदली झाली आहे पण त्याला तिथे काम करायचे नाही कारण, त्याला तिच्यापासून दूर राहायचे नाही असं देखील सांगून फसवलं. पण नंतर पोलखोल झाली आणि जोनमाईने त्याला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.