श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती! 'तिने' सासूसह नवऱ्याला संपवलं; फ्रीजमध्ये ठेवले तुकडे अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:08 AM2023-02-21T10:08:38+5:302023-02-21T10:15:59+5:30
नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे.
आसाममध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पती आणि सासूची हत्या केल्यानंतर एका महिलेने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून मेघालयात फेकून दिले. आता या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला, तिचा प्रियकर आणि महिलेच्या बालपणीच्या मित्राला अटक केली आहे. महिलेने गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही हत्या केली होती.
तपासादरम्यान आरोपी महिलेच्या सासूच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले आहेत. गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगांत बारा यांनी सांगितले की, आरोपी महिला वंदना कलिता हिने तिचा प्रियकर आणि बालपणीच्या मित्राासोबत सात महिन्यांपूर्वी ही हत्या केली होती. आम्ही सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
चुलत भावाने व्यक्त केला संशय
पोलिसांनी सांगितले की वंदना कलिता यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पती अमरेंद्र डे आणि सासू शंकरी डे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते की काही दिवसांनी अमरेंद्रच्या चुलत भावाने दुसरी तक्रार दाखल केली. अमरेंद्रच्या चुलत भावाने पत्नीवरच संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. चौकशीत पत्नी, तिचा प्रियकर आणि महिलेचा बालपणीचा मित्र यांचा सहभाग आढळून आला.
फ्रीजमध्ये ठेवण्यात आले मृतदेहाचे तुकडे
पती आणि सासूची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. हत्येनंतर सुमारे तीन दिवसांनी ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मेघालयला रवाना झाले.
तुकडे डोंगरावरून खाली फेकले
पोलिसांनी सांगितले की, हत्येनंतर, आरोपींनी त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहांचे छोटे तुकडे केले आणि नंतर ते तुकडे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले आणि मेघालय सीमेजवळील डोंगरावरील खोल दरीत फेकून दिले. पोलिसांनी सांगितले की, मृतांच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले आहेत. सध्या पोलीस सर्व तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"