एटीएम बदलून ९० हजार उडविले :  निवृत्त अधिकाऱ्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:23 AM2020-01-09T00:23:28+5:302020-01-09T00:24:06+5:30

एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मदत करताना सेवानिवृत्त डब्ल्यूसीएल अधिकाऱ्याच्या खात्यातून ९० हजार रुपये उडविल्याची घटना कामठी ठाण्यांतर्गत घडली आहे.

ATM changed fraud 90,000: Retired officer victimized | एटीएम बदलून ९० हजार उडविले :  निवृत्त अधिकाऱ्याला फटका

एटीएम बदलून ९० हजार उडविले :  निवृत्त अधिकाऱ्याला फटका

Next
ठळक मुद्देकामठीत घडली घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मदत करताना सेवानिवृत्त डब्ल्यूसीएल अधिकाऱ्याच्या खात्यातून ९० हजार रुपये उडविल्याची घटना कामठी ठाण्यांतर्गत घडली आहे.
मोहनलाल पाल (७०) रा. न्यू तुकाराम ले-आऊट, कळमना हे डब्ल्यूसीएलमधून कार्यालय अधीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. ते कन्हान गोंडेगावचे रहिवासी आहेत. मंगळवारी मतदान करण्यासाठी ते आपला मित्र रमेश यादव सोबत कन्हानला गेले होते. यादवही डब्ल्यूसीएलचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. कामठीच्या गरुड चौकाजवळ स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएमजवळ पाल यांनी यादवला आपले एटीएम देऊन पैसे काढण्यास सांगितले. त्यांनी यादवला एटीएमचा पासवर्ड सांगितला. त्यावेळी एक युवक एटीएमजवळ उभा होता. त्याने पाल आणि यादव यांची चर्चा ऐकली. यादव एटीएममधून पैसे काढत असताना एटीएम मंदगतीने काम करीत होते. दरम्यान आरोपी यादवच्या मागे येऊन उभा झाला. त्याने यादवला मदत करण्याची बतावणी करून एटीएम कार्ड घेतले. त्याने यादव यांची नजर चुकवून त्यांना दुसरे एटीएम देऊन फरार झाला. यादवला फसवणूक झाल्याचे लक्षात आले नाही. एटीएम हाती लागताच आरोपीने पाल यांच्या खात्यातून ८९ हजार ९८८ रुपये आॅनलाईन ट्रान्सफर केले. मोबाईलवर मॅसेज येताच पाल यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांना एटीएम बदलल्याचे समजले. त्यांनी आपल्या मुलाला सूचना दिली. त्यांच्या मुलाने त्वरित बँकेला सूचना देऊन एटीएम बंद केले. आरोपीने यादव यांना एका महिलेच्या नावाचे एटीएम दिले. ही महिलाही आरोपीची शिकार झाली असावी, असा अंदाज आहे. पाल यांनी कामठी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेज आणि ट्रान्सफर केलेल्या रक्कमेचा शोध घेतल्यास आरोपीची माहिती मिळु शकते. घटनेतील आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याची शंका आहे. गरुड चौकाच्या एसबीआय एटीएमवर यापुर्वीही बँकेच्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे. तेथे सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने पैसे काढण्यासाठी येतात. गुन्हेगार मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करतात.

Web Title: ATM changed fraud 90,000: Retired officer victimized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.