नोकरी सोडलेल्या कामगाराने लुटले एटीएम; घरात लपवलेली लाखोंची रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:01 AM2020-10-11T00:01:12+5:302020-10-11T00:01:34+5:30
फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
नालासोपारा : वसई पूर्वेकडील बंद एटीएम मशीन फोडून लाखो रुपये लुटण्याचा प्रयत्न माजी कामगारानेच केल्याचे उघड झाले आहे. वालीव पोलिसांनी आरोपीच्या घरातून बारा तासांच्या आत गुन्ह्यातील लुटलेली लाखोंची रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.
वसई पूर्वेकडील फादरवाडी येथे डीसीबी बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम २० सप्टेंबरपासून बंद होते. या एटीएमला पैसे पुरवण्याचे कंत्राट सीएमएस कंपनीकडे होते. हे एटीएम फोडून लुटण्याचा प्रयत्न याच कंपनीत दोन महिन्यांपूर्वी काम करणाऱ्या कामगारानेच केला आहे. या एटीएमच्या आतील सीसीटीव्ही रिपेरिंग करण्यासाठी काढून नेलेले होते. आरोपीने शुक्र वारी सकाळी ८ वाजता बंद एटीएमच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. एटीएम मशीन फोडून त्याने पाचशेच्या दोन हजार १८४ नोटा म्हणजे १० लाख ९२ हजार रुपये चोरी केले.या चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी वालीव पोलीस पोहोचले.
ज्याला पासवर्ड माहीत असेल त्याच कामगाराने चोरी केल्याचा पोलिसांना संशय आला. डीसीबी बँकेच्या एटीएमला पैसे पुरवण्याचे कंत्राट कंपनीला आहे, त्या कंपनीतील लोकांची चौकशी करण्यास सुरु वात केली. दोन महिन्यांपूर्वी पैसे मशीनमध्ये टाकणाºया कामगाराने काम सोडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारून चोरीचे १० लाख ७० हजार रु पये पोलिसांना सापडले आहेत. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग कंपनीच्या स्वाधीन केले आहे.
आरोपी फरार झाला असून वालीव पोलिसांची तीन ते चार पथके त्याचा शोध घेत आहेत. सीएमएस कंपनीचे कर्मचारी सागर सनील सावंत यांनी वालीव पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.