चंदीगढ : कोरोनाची साथ व त्यापायी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चंदीगढमधील चोरी, खून, लूटमार, फसवणूक या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असून, घरात महिलांवर होणारे अत्याचार, सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे तसेच पोलिसांच्या कामातही थोडासा बदल झाला आहे. ज्या गुन्ह्यांत सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे अशा गुन्हेगारांना, विशेषत: जे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या भागात राहत आहेत तेथील आरोपींना सध्या अटक करू नका असे आदेश देण्यात आले आहेत.
चंदीगढ पोलिसांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वत:च्या आरोग्याचेही रक्षण करावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, खून, लूटमार, सोनसाखळी खेचणे, रस्त्यावरील अपघात अशा गुन्ह्यांचे प्रमाण २४ मार्च ते २० मे या कालावधीत ७० टक्के घटले असून, घरातील महिलांवर होणारे अत्याचार, आत्महत्या, सायबर गुन्हे यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.
चंदीगढमध्ये कोरोना साथीमुळे २३ मार्च रोजी रात्री लागू केलेली संचारबंदी ५ मे रोजी हटविण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाची साथ येण्यापूर्वी चोर, दरोडेखोरांना पकडणे हे पोलिसांचे मुख्य काम होते. मात्र आता तोंडावर मास्क न घालता घराबाहेर पडणाऱ्यांना पकडणे, लोकांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडणे, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट होण्यासाठी मदतीचा हात देणे अशी कामे सध्या पोलीस करत आहेत.
पोलिसांवर हल्ला करणाºयांना अटक नाही
च्संचारबंदी लागू असताना या शहरातील धानस भागातल्या कच्ची कॉलनी, मणी माजरा येथे पोलिसांवर नागरिकांनी हल्ला करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली असली तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. शहरात दारु पिऊन गाडी चालविणाºयांकडून दंड वसूल करण्याची कारवाईही सध्या थांबविण्यात आली आहे.