मुंबई - दहशतवाद विरोध पथकच्या (एटीएस) जुहू युनिटने ५ कोटी ६० लाख ६० हजार रुपयांचा १४ किलो ३०० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पुण्याच्या सासवडमधून हस्तगत केला असून याप्रकरणी महेंद्र परशुराम पाटील (४९) आणि संतोष बाळासाहेब आडके (२९) यांना अटक केली आहे.
या अटक दोन आरोपींकडून विलेपार्ले पूर्व आणि पुण्यातील जाधववाडी येथील कारखान्यातून १४ किलो ३०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला होता. या ड्रग्जची किंमत ५ कोटी ६० लाख ६० हजार इतकी आहे. एटीएसने एनडीपीएस कायदा कलम २२, २९ सह भा. दं. वि. कलम ८ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात १९ फेब्रुवारीला एटीएसच्या जुहू युनिटच्या पथकास यापूर्वी अटक केलेल्या संतोष बाळासाहेब आडके याची पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथील श्री अल्फा केमिकल्स येथे एमडी बनविण्याची फॅक्टरी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार याठिकाणी छापा टाकला असता फॅक्टरीमध्ये १० किलो ५०० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ किंमत अंदाजे ४ कोटी २ लाख आणि १ कोटी २५ लाख रुपयांचा कच्चा माल (केमिकल) जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या कच्च्या केमिकलपासून ८० कोटी रुपयांचे २०० किलो एमडी हा अमली पदार्थ बनवला जाऊ शकतो. या कारवाईमुळे अमली पदार्थच्या काळ्याबाजारास हादरा बसला आहे.