यू ट्यूबच्या सहाय्याने डोंबिवलीत बनावट नोटा छापणारी दुकली अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 08:34 PM2019-02-26T20:34:48+5:302019-02-26T20:36:42+5:30

भूषण साळुंखे आणि सुकेश बांगेरा अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

Attempted fake stoogic shop in Dombivli with Youtube | यू ट्यूबच्या सहाय्याने डोंबिवलीत बनावट नोटा छापणारी दुकली अटकेत 

यू ट्यूबच्या सहाय्याने डोंबिवलीत बनावट नोटा छापणारी दुकली अटकेत 

Next
ठळक मुद्देनवी मुंबईतील भूषण साळुंखे हा गोरखधंद्याचा सूत्रधार आहे.साळुंखे याने किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करत आहेत.

डोंबिवली - कॉम्प्युटर आणि प्रिंटरच्या सहाय्याने दोन हजारांच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीत गजबजलेल्या ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता. भूषण साळुंखे आणि सुकेश बांगेरा अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

नवी मुंबईतील भूषण साळुंखे हा गोरखधंद्याचा सूत्रधार आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी यू टय़ूबवर नोटा कशा तयार होतात याचा व्हिडीओ पाहून त्याचा आधार घेऊन संगणक आणि एका प्रिंटरच्या सहाय्याने त्याने 2 हजारांच्या बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र, एका व्यवहारातून त्याची ही फसवेगिरी उघडकीस आली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. साळुंखे याने किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Attempted fake stoogic shop in Dombivli with Youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.