ठळक मुद्देनवी मुंबईतील भूषण साळुंखे हा गोरखधंद्याचा सूत्रधार आहे.साळुंखे याने किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करत आहेत.
डोंबिवली - कॉम्प्युटर आणि प्रिंटरच्या सहाय्याने दोन हजारांच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीत गजबजलेल्या ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता. भूषण साळुंखे आणि सुकेश बांगेरा अशी अटक आरोपींची नावे आहेत.
नवी मुंबईतील भूषण साळुंखे हा गोरखधंद्याचा सूत्रधार आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी यू टय़ूबवर नोटा कशा तयार होतात याचा व्हिडीओ पाहून त्याचा आधार घेऊन संगणक आणि एका प्रिंटरच्या सहाय्याने त्याने 2 हजारांच्या बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र, एका व्यवहारातून त्याची ही फसवेगिरी उघडकीस आली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. साळुंखे याने किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करत आहेत.