नात्याला काळीमा! पैशासाठी मुलाने आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला अन् मिळवले तब्बल 43 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 03:01 PM2021-09-10T15:01:52+5:302021-09-10T15:10:01+5:30
Crime News : एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला अन् तब्बल 43 लाख मिळवल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
पैशासाठी लोक वाटेल ते करतात. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैसे मिळावे म्हणून एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला अन् तब्बल 43 लाख मिळवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ऑस्ट्रियामध्ये ही घटना घडली आहे. एका 66 वर्षीय व्यक्तीने आपल्या 80 वर्षीय महिलेचा मृतदेह जवळपास एक वर्षांहून अधिक काळ आपल्या घराच्या तळघरात तपवून ठेवला. त्यामुळे महिलेच्या मृत्यूनंतरही तिला मिळणारे पैसे मुलाला मिळत होते. महिलेचा गेल्यावर्षी जूनमध्ये मृत्यू झाला.
66 वर्षांचा मुलगा ऑस्ट्रियाच्या टायरॉल प्रदेशात त्यांच्या राहत्या घरी मृतदेहासोबत राहत होता. एक पोस्टमन घरी आल्यानंतर या धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाला आहे. गेल्या वर्षभरात या मुलाला महिलेला पेन्शन म्हणून मिळणारे तब्बल 43 लाख रुपये मिळाले. याच दरम्यान, त्यांच्या घरी एक पोस्टमन आला. तो पोस्टमन नवीन असल्याने त्याने त्या महिलेला पाहायचं असल्याचं सांगितलं. मुलाने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्या पोस्टमनने अधिकाऱ्यांना याबद्द्ल माहिती दिली. अधिकाऱ्यांनी या व्यक्तीच्या घरी येऊन चौकशी केली असता मुलाचं बिंग फुटलं.
भाजपा नेत्याच्या हत्येने परिसरात खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल, अधिक तपास सुरू #BJP#crime#Policehttps://t.co/MwEC8F8AYy
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2021
अशी झाली पोलखोल
महिलेचा एक वर्षापेक्षा अधिक काळ तळघरात ठेवलेला मृतदेह बाहेर आला. या व्यक्तीवर पैशांसाठी फसवणूक केल्याचा आणि मृतदेह लपवल्याचा आरोप आहे. अधिक चौकशी केली असता या व्यक्तीने मृत्यूनंतर आईचा मृतदेह आईसपॅकने गोठवला आणि वास पसरू नये म्हणून तळघरात ठेवल्याचं कबूल केलं. शरीरातील कोणतंही द्रव बाहेर पडू नये म्हणून त्याने मृतदेह पट्ट्यांमध्ये गुंडाळला. त्याने कचऱ्याने मृतदेह झाकून त्याचे ममीकरण केले होते. तर आरोपीने आपल्या भावाला देखील आई रुग्णालयात असल्याचं वर्षभर खोटं सांगितलं. पण अखेर सत्य बाहेर आलं. हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! बारावी पास तरुणाने डॉक्टरला जाळ्यात ओढलं अन् तब्बल 2 कोटींना लुटलं; अशी झाली पोलखोल#Doctor#Honeytraphttps://t.co/xxxmh8G7Vq
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021
मोबाईल नंबर मागणाऱ्या रोडरोमिओला 'तिने' चांगलीच अद्दल घडवली; भररस्त्यात चप्पलेने यथेच्छ धुलाई केली https://t.co/7C1IJg7bt2
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021