बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 09:22 PM2018-09-29T21:22:39+5:302018-09-29T21:26:19+5:30

रोमी राजन कपूर उर्फ कौशिककुमार कौस्तुभ नाथ (वय ४१), साकेत अशोक दीक्षित (वय ३४), विशाल तारकेश्वर तिवारी (वय ४१), जिग्नेश जितेंद्र राजानी (वय ३१), विकास भास्कर डोंगरे (वय ३४) ही या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांना न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Bank robbery of millions of crores of rupees | बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद 

बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद 

googlenewsNext

मुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे बनावट नावे बँकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या पोलीस पथकाने अटक केली आहे. ही टोळी बनावट नावाच्याआधारे बनावट नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना काढून बँकांची फसवणूक करत होती. विविध बँकांमधील ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी वाहन आणि गृह कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न करता ते बँकांची फसवणूक करत होते. रोमी राजन कपूर उर्फ कौशिककुमार कौस्तुभ नाथ (वय ४१), साकेत अशोक दीक्षित (वय ३४), विशाल तारकेश्वर तिवारी (वय ४१), जिग्नेश जितेंद्र राजानी (वय ३१), विकास भास्कर डोंगरे (वय ३४) ही या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांना न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

बँक एजंट असलेल्या आरोपीची मदत घेऊन इंडियन बँक मांडवी शाखेतून २९ लाख व २१ लाख अशी दोन वाहन कर्ज काढली. सदर सर्व रक्कम आरोपी हे वाटून घ्यायचे. या टोळीने करोडो रुपयांचा चुना विविध बँकांना लावला असल्याचे स्पष्ट झाले, एवढेच नाही तर रोमी कपूर उर्फ कौशिक याने कोलकत्ता येथेही कोट्यवधींचा चुना लावल्याचे समोर आले आहे.

Web Title: Bank robbery of millions of crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.