बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापणार, भाजपने पालकमंत्र्यांच्या विरोधात बॅनर पोलिसांनी काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:42 PM2022-02-23T21:42:50+5:302022-02-23T21:43:21+5:30

Bjp banner removed by police : भाजप शिवसेना पुन्हा आमने सामने आली आहे. निवडणूकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

Banner hoisting will heat up the political atmosphere, BJP's banner removed by police against the Guardian Minister | बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापणार, भाजपने पालकमंत्र्यांच्या विरोधात बॅनर पोलिसांनी काढला

बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापणार, भाजपने पालकमंत्र्यांच्या विरोधात बॅनर पोलिसांनी काढला

googlenewsNext

कल्याण-डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत  पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत अशी अत्यंत जहाल टिका केली. त्यांची पत्रकार परिषद संपण्यापूर्वीच डोंबिवलीत एक बॅनर झळला. त्यावर परम आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी आहे या आशयचा बॅनर झळकला. हा बॅनर आापला डोंबिवलीकर रविंद्र चव्हाण या नावाने लावला होता. हा बॅनर झळकताच पोलिस आणि पालिकेचे कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा बॅनर हटविण्याची कारवाई केली आहे. यावरुन भाजप शिवसेना पुन्हा आमने सामने आली आहे. निवडणूकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

आमदार चव्हाण यांनी या बॅनवर डोंबिवलीसाठी 472 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झाला हेाता. तो पालकमंत्र्यांनी रद्द केला. भाजप आमदारांनी यापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्या पाठोपाठ आत्ता त्यांनी पालकमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. यापूर्वीही भाजपने घनकचरा कर लागू केल्याच्या निषेधार्थ बॅनरबाजी केली होती. हा बॅनर लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. हा बॅनर काढला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा वादग्रस्त बॅनर काढून टाकण्यात आला आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जाहिरात बाजीचे कंत्रट कंत्रटदाला दिले आहे. त्याच्याशी महापालिकेचा काही संबंध नाही. 


बॅनर काढल्यानंतर भाजप आमदार चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, बॅनर लावण्याची रितसर परवानगी महापालिकेकडून घेतली होती. त्यासाठी लागणारे शुल्क ही भरले होते. मात्र शिंदे यांच्या दडपशाही कशी काय सुरु आहे. हेच यातून पुन्हा एकदा उघड झाले होते. 


एखाद्या बॅनर लावायचा असल्यास त्यावर मजकूर काय असेल याची शहानिशा करणो बॅनर लावणा:या परवानगी देणा:या महापालिका प्रशासनाची आहे. प्रशासनाने हात वरती केले असले तरी परवानगी आणि शुल्क घेऊन बॅनर काढण्याची कारवाईही केली आहे.

Web Title: Banner hoisting will heat up the political atmosphere, BJP's banner removed by police against the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.