हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन डोक्यात बाटली फोडण्यासह रॉडने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 04:55 PM2019-03-21T16:55:18+5:302019-03-21T16:59:46+5:30

आरडाओरडा करीत असताना हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली.

beaten due to told slow speaking | हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन डोक्यात बाटली फोडण्यासह रॉडने मारहाण

हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन डोक्यात बाटली फोडण्यासह रॉडने मारहाण

googlenewsNext

पिंपरी : आरडाओरडा करीत असताना हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. तर दुसरया तरुणाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. 
    गौतम गणपत वाघमारे (वय २१, रा. कॉलनी क्र. ०८, साई मंदीराजवळ, दिघी), अभिजीत सल्मोन गायकवाड (वय १८, रा. सर्व्हे नं. ७८, मार्ता व्हिला, गजानन महाराजनगर, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी केतन मच्छिंद्र भालेराव (वय २२, रा. राजे संभाजी कॉलनी, वॉटर टँकरजवळ, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केतन भालेराव हे त्यांचे मित्र ज्योतिबा कांबळे, गजानन समदडे यांच्यासमवेत भोसरीतील इंद्रायणीनगर येथील इंद्रायणी चौकातील कुंतेय चायनिज सेंटर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी आरोपी आरडाओरडा करीत असताना ज्योतिबा कांबळे यांनी ह्यजरा हळु बोलाह्ण असे म्हणाले. याचा राग आल्याने एका आरोपीने काचेची बाटली डोक्यात फोडून अर्धवट फुटलेली बाटली कांबळे यांच्या पोटात खुपसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करुन फिर्यादी भालेराव व त्यांचा मित्र समदडे यांना लाथाबुक्कक्यांनी मारहाण करण्यासह रॉडने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: beaten due to told slow speaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.