कर्ज काढताय सावधान! लोन एजंटने लावला लॉन्ड्री चालकाला लाखोंचा लावला चुना, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 05:32 PM2020-10-06T17:32:31+5:302020-10-06T17:33:09+5:30
Crime News : लोन एजंटसह त्याच्या ९ अनोखळी साथीदारांवर नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
भिवंडी - कर्जाच्या पैशांचा ओझा असणाऱ्या एका लॉन्ड्री चालकाला खासगी फायनांस कंपनीतून लोन काढून देऊन २० लाख रुपये बंदे दिले तर त्या बदल्यात २८ लाख रुपये सुट्टे मिळतील असे अमिश दाखवून लॉंड्री चालकाची तब्बल वीस लाखांची फसवणूक झाल्याची घटना भिवंडीत सोमवारी समोर आली आहे . हि घटना मुंबई - नाशिक महामार्गावरील मिनी पंजाब समोर असलेल्या गोदामाच्या गेटवर घडली असून याप्रकरणी लॉन्ड्री चालकाने लोन एजंटसह त्याच्या ९ अनोखळी साथीदारांवर नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
धक्कादायक! देशी दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
महेश खेमजी साकला (वय,५२, रा. कांदिवली मुंबई ) असे फसवणूक झालेल्या लॉन्ड्री चालकाचे नाव आहे. तर भरत मोहनलाल गोहिल (वय,५२, रा. रामनगर कांदिवली पूर्व ,मुंबई) असे लोन एजंटचे नाव आहे . महेश साकला यांनी मित्राकडून १३ लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परत फेड करायची म्हणून लोन एजंट भरत याच्या माध्यमातून २५ लाख रुपये कर्ज घर गहाण ठेवून घेतले. याचाच फायदा घेऊन मुख्य आरोपी भरत याने लॉन्ड्री चालक महेश यांना २० लाख रुपये बंदे दिले तर काही माणसे त्या बदल्यात २८ लाख रुपये देतील त्यामुळे ८ लाख फायदा होईल असे आमिष दाखवले. याला बळी पडून ठरल्याप्रमाणे लॉन्ड्री चालक व त्याचा मुलगा २० लाख रोख रक्कम बॅगेत भरून सोमवारी सायंकाळच्या सुमाराला मुंबई - नाशिक महामार्गावरील मिनी पंजाब हॉटेलसमोर असलेल्या गोदामाच्या गेटवर आले. तर याठिकाणी भारत आधीपासूनच येऊन थांबला होता. तसेच त्याचे आणखी ५ साथीदार वॅगनार कारमध्ये आल्यानंतर २० लाख रुपयांची रक्कम भरत याने कारमध्ये बसलेल्या अनोखळी व्यक्तीस देण्यास सांगितले असता अचानक मारहाणीचे नाटक करून मुख्य आरोपी भरत हा ८ साथीदारांसह २० लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. बी. चव्हाण करीत आहेत.