मुंबई - अनेकांना लपून, एकटं असताना पॉर्न पाहण्याची सवय असते. तसेच तुम्हाला लपूनछपून पॉर्न पाहण्याची सवय असेल तर सावध व्हा. कारण लपून पॉर्न पाहणाऱ्यांना हॅकर्स आपल्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करत असून पैशांची मागणी करत आहेत. अशा प्रकारचे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत असून अशा क्राईमपासून सावध राहणं गरजेचं आहे.एखाद्याला पॉर्न पाहाणं तुम्हाला चांगलचं महागात पडू शकतं. लपून पॉर्न पाहणाऱ्या तरुणांना हॅकर्स छुप्या पद्धतीने रेकॉर्ड करून पैसे उकळण्यासाठी धमकवत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पॉर्न पाह्तानाच्या वेळचा व्हिडिओ तयार केल्याची बतावणी करून तरुणांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार सायबर क्राईमचा नवा प्रकार आहे. मात्र, तुम्ही पॉर्न पाहात असाल तर तुम्हीही अशा हॅकर्सच्या जाळ्यात अडकून फसवू शकता. त्यामुळे वेळीच अशा हॅकर्सकडून येणाऱ्या मेलपासून सावध राहा. मात्र, काही हॅकर्स तरुण पॉर्न पाहात असताना त्यांना त्या वेबसाइटच्या माध्यमातून छुप्या पद्धतीनं रेकॉर्ड करतात. त्यानंतर तुमच्या ई - मेलवर एक मेल पाठवला जातो. यामध्ये तुम्हाला तुमचा व्हिडीओ बनवल्याचे सांगून तो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. ही धमकी देऊन डॉलर स्वरूपात पैशांची मागणी केली जाते. दरम्यान, हॅकर्स ठरावी एक रक्कम मागतात. ती रक्कम न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. मागण्यात आलेली रक्कम न दिल्यास तो खासगी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी हॅकर्स दिली जाते. अशा प्रकारच्या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी युजर्सला अशा कोणत्याही ई-मेलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसंच कोणत्या हॅकर्सच्या मेलला बळी पडू नये असंही आवाहन सायबर सेलकडून वारंवार कऱण्यात आलं आहे.
लपूनछपून पॉर्न पाहत असाल तर सावधान; अशा प्रकारे सापडू शकता हॅकर्सच्या तावडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 3:13 PM
अशा प्रकारचे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत असून अशा क्राईमपासून सावध राहणं गरजेचं आहे.
ठळक मुद्देएखाद्याला पॉर्न पाहाणं तुम्हाला चांगलचं महागात पडू शकतं.काही हॅकर्स तरुण पॉर्न पाहात असताना त्यांना त्या वेबसाइटच्या माध्यमातून छुप्या पद्धतीनं रेकॉर्ड करतात.कोणत्या हॅकर्सच्या मेलला बळी पडू नये असंही आवाहन सायबर सेलकडून वारंवार कऱण्यात आलं आहे.