मोठी बातमी: चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून १५ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष, २५० कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:30 AM2021-06-09T10:30:14+5:302021-06-09T10:31:30+5:30

Rs 250 crore scam: कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Big news: Rs 250 crore scam to double money in 15 days through Chinese app | मोठी बातमी: चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून १५ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष, २५० कोटींचा गंडा

मोठी बातमी: चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून १५ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष, २५० कोटींचा गंडा

Next

देहराडून/नोएडा - कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तराखंड एसटीएफने एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एसटीएफने २५० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून एका आरोपीला अटक केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे ही फसवणूक केवळ चार महिन्यांमध्ये करण्यात आली. चीनमधील स्टार्टअप योजनेंतर्गत तयार झालेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. चीनच्या स्टार्टअप योजनेमधून पॉवर बँक अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप भारतामध्ये आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जाते.  त्या माध्यमातून केवळ चार महिन्यांमध्ये या ठकसेनांनी २५० कोटी रुपयांचा चुना लोकांना लावला. 

ही फसवणूक करणारे बदमाश लोकांना पॉवर बँक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगत होते. जेव्हा लोकांकडून हे अ‍ॅप डाऊनलोड केले जायचे तेव्हा त्यांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जायचे. धक्कादायक बाब म्हणजे हा धंदा सुमारे चार महिने चालला होता. मात्र पोलिसांना याची खबर नव्हती. अखेर उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर या घटनेचा उलगडा झाला. 

 तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले की, पॉवर बँक अ‍ॅप नावाच्या अ‍ॅपमध्ये १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्यासाठी त्यांनी दोन वेळा ९३ हजार ७२ रुपये जमा केले होते. मात्र पैसे दुप्पट झाले नाहीत. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता तब्ब्ल २५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.


या प्रकरणी उत्तराखंड एसटीएफने तपास करून नोएडा येथून पवन पांडेय या एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून तब्बल ५९२ सिमकार्ड, १९ लॅपटॉप आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एसटीएफने केलेल्या तपासात ही रक्कम क्रिप्टोकरंसीमध्ये बदलून परदेशात पाठवली जात असल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती आयबी आणि रॉ या संस्थांनाही देण्यात आली आहे.  

Web Title: Big news: Rs 250 crore scam to double money in 15 days through Chinese app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.