बिग बॉस फेम एजाज खानला NCB ने केली अटक; अंधेरीतील घरावर छापेमारी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:45 PM2021-03-30T18:45:40+5:302021-03-30T18:47:11+5:30
Ayaz Khan arrested by NCB : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील अटक केली होती.
बिग बॉस 7 फेम अजाज खानला अमली पदार्थाच्या एका प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, शादाब बटाटा याला अटक करण्यात आली होती आणि त्याने चौकशी दरम्यान एजाजचा उल्लेख केला होता. सध्या एनसीबी एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील निवासस्थानावर छापे टाकत आहे. या अभिनेत्याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील अटक केली होती.
नारकोटिक्स कंट्रल ब्यूरो म्हणजे एनसीबीला मोठं यश मिळालं आहे. NCB ने कारवाई करत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला गुरूवारी रात्री साधारण २ कोटी रूपयांच्या MD ड्रग्ससोबत अटक केली. फारूख बटाटाचा मुलगा शादाब बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्स सप्लाय करत होता. मुंबईत रदेशातून येणाऱ्या ड्रग्सचा सर्वात मोठा सप्लायर फारूख बटाटाच आहे. एकेकाळी मुंबईत बटाटे विकणार फारूख ड्रग्सचा मोठा सप्लायर झाला.याने चौकशीत एजाजचे नाव घेतल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
अभिनेता एजाज खानला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर
अभिनेता एजाज खानच्या घरावर पोलिसांचा छापा? भाजपावर केला गंभीर आरोप
२०१८ साली अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सिने अभिनेता एजाज खान याला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. सीबीडी बेलापूर सेक्टर 20 येथे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. एजाज खान याने अनेक टिव्ही मालिका व बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे. सीबीडी बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये एजाज ड्रग्जच्या गोळ्या घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला याचा पोलीस तपास करत होते. २.३० ग्रॅम वजनाचा एमडीएम (Ecstasy) हा अमली पदार्थ पोलिसांनी खानकडून हस्तगत केला होता.