प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरून व्हायरल केला व्हिडीओ, तरूणीच्या भावांनी चाकूने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 03:14 PM2021-06-24T15:14:19+5:302021-06-24T15:25:56+5:30
पीडित तरूणाचं नाव गोलू कुमार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टोला गावातील या तरूणाने आपल्याच गावाजवळीच दुसऱ्या गावातील तरूणीसोबत प्रेम विवाह केला होता.
बिहारच्या गोपालगंजमध्ये एका प्रियकराला प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरून लग्न करणं चांगलंच महागात पडलंय. प्रेयसीच्या घरातील लोकांनी या घटनेनंतर आधी प्रियकराला मारहाण केली आणि त्यानंतर चाकूने सपासप अनेक वार करत त्याला जखमी केलं. तरूणाला जखमी केल्यानंतर तरूणीचे कुटुंबीय तिला सोबत घरी घेऊन गेले.
आता जखमी तरूणाने सोशल मीडियावर लग्न करतानाचा आणि चाकूने वार केल्यावर जखमी झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियकराने आरोप लावला की, प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्याला लग्न केल्यानंतर चाकूने वार करत जखमी केलं. (हे पण वाचा : जीव देण्यासाठी डोंगराहून उडी घेतलेली महिला झाडावर अडकली, एका तासानंतर तिला असं काढलं)
पीडित तरूणाचं नाव गोलू कुमार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टोला गावातील या तरूणाने आपल्याच गावाजवळीच दुसऱ्या गावातील तरूणीसोबत प्रेम विवाह केला होता. त्याने लग्न करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि व्हिडीओ शेअर करत तरूणीच्या भांगेत कुंकू भरत लग्न केल्याचा दावा केला. (हे पण वाचा : मुंबईत झालं एकतर्फी प्रेम, नंतर जयपूरमध्ये माथेफिरू प्रियकराने घडवली 'डर' सिनेमाची कहाणी)
या व्हिडीओसोबत त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याच्या हातावर आणि पोटावर चाकूने वार केल्याच्या जखमा दिसत आहेत. पीडित तरूणाचा आरोप आहे की, तो काही कामाने घरातून बाहेर जात होता. तेव्हाच त्याच्या पत्नीच्या भावाने त्याला धरलं आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले. ही घटना सोमवारची आहे. जखमी तरूणाला स्थानिक लोकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरूणानुसार, मोबाइल फोनच्या मिस कॉलच्या माध्यमातून त्याची लव्हस्टोरी सुरू झाली होती. त्यानंतर दोघांनी सहमतीने लग्न केलं. (हे पण वाचा : शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, लग्नाच्या २ महिन्यांनंतर झाला धक्कादायक खुलासा)
लग्नानंतर दोघेही काही दिवसांपर्यंत सोबतच होते. पण सोमवारी प्रेयसीच्या भावांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि तरूणीला आपल्या सोबत घेऊन गेले. दरम्यान पीडित तरूणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ७ लोकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आणि ५५०० रूपये हिसकावून घेतल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.