ठाणे : ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला ३ कोटींची खंडणी मागून त्याच्याकडून तीन लाखांची वसूल केल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांना सोमवारी कासारवडवली पोलिसांनीअटक केली आहे. त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
धक्कादायक ! लैंगिक अत्याचार करुन खंडणी उकळणारा पोलिसांचा खबरी जेरबंद
घोडबंदर रोड येथील एका बडया बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध २०१५ मध्ये तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करीत कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पवार यांनी २००८ मध्ये त्यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पवार यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अगदी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेल्यानंतर तिथेही त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यानंतर गेली काही दिवस कासारवडवली पोलीस त्यांच्या मागावर होते. परंतु, ते पोलिसांना हुलकावण्या देत होते. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक पी. एन. उगले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगरात पत्रकारासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल