BPCL Mumbai Fire : मोठा दिलासा...बीपीसीएल कंपनीतील सर्व कामगार सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 04:01 PM2018-08-08T16:01:01+5:302018-08-08T16:01:49+5:30

BPCL Mumbai Fire:ग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने ४ ते ५ कामगार जखमी झाले असून त्यांना बीपीसीएलच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

BPCL Mumbai Fire: All the workers in Chembur BPCL Company are safe | BPCL Mumbai Fire : मोठा दिलासा...बीपीसीएल कंपनीतील सर्व कामगार सुखरूप

BPCL Mumbai Fire : मोठा दिलासा...बीपीसीएल कंपनीतील सर्व कामगार सुखरूप

googlenewsNext

मुंबई - चेंबूरच्या माहुलगाव येथील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण माहुल-चेंबूर परिसर हादरून गेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या आगीत कंपनीतील २०० ते ४०० कामगार अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच माहुल रोडवर मोठी वाहतुकीची कोंडी झाली असल्याचे आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत देसाई यांनी सांगितले. तसेच खासदार राहुल शेवाळे यांनी सर्व कामगार सुखरूप असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. तर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने ४ ते ५ कामगार जखमी झाले असून त्यांना बीपीसीएलच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तसेच अग्निशमन दलाच्या एकूण २८ गाड्यांचा ताफा घटनास्थळी आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीपीसीएल मेन गेटचा बंद करण्यात आला असून आत पोलिसांना जाण्यास मनाई असल्याचे देसाई यांनी सांगितले. आज दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी बीपीसीएलच्या सल्फर प्लान्टमध्ये ही भीषण आग लागली. आग लागल्यानंतर प्रचंड मोठे स्फोट झाले.  त्यानंतर लगेच धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उठले आहेत.  त्याचप्रमाणे बीपीसीएलने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी हायड्रोक्रॅकर प्लांटमध्ये स्फोट होऊन कॉम्प्रेसरला आग लागली होती. मात्र प्राथमिक पातळीवर रिफायनरी फायर फायटिंग टीमने आग विजवण्याचे प्रयत्न केले. प्लांटमधील २ कागमार किरकोळ जखमी झाले असून त्यांना बीपीसीएलच्या मेडिकल सेंटरमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

Web Title: BPCL Mumbai Fire: All the workers in Chembur BPCL Company are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.