जबरदस्त! मुलीने धाडस दाखवत अपहरणकर्त्याकडून केली सुटका, नेमकं काय घडल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 10:55 AM2022-12-09T10:55:07+5:302022-12-09T10:55:47+5:30

हरियाणातील करनालमध्ये एका धाडसी मुलीने अपहरकर्त्याकडून स्वत:ची सुटका केल्याचे समोर आले आहे.

brave girl overpowers on kidnapper in karnal of haryana | जबरदस्त! मुलीने धाडस दाखवत अपहरणकर्त्याकडून केली सुटका, नेमकं काय घडल?

जबरदस्त! मुलीने धाडस दाखवत अपहरणकर्त्याकडून केली सुटका, नेमकं काय घडल?

googlenewsNext

हरियाणातील करनालमध्ये एका धाडसी मुलीने अपहरकर्त्याकडून स्वत:ची सुटका केल्याचे समोर आले आहे. मुलगी नऊ वर्षाची आहे. मुलीने धाडस दाखवत आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली,तिच्या शौर्याचे कौतुक होत आहे.

ही घटना हरियाणातील आहे. येथील चिदव गावातील संजना परोचा ही मुलगी गावातीलच सरकारी शाळेत चौथीच्या वर्गात शिकते. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संजना ही दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. यादरम्यान, आरोपी श्रावण (वय 35) हा मूळचा बिहारमधील समस्तीपूर येथील असून सध्या जुंदला येथे राहतो आहे. त्याने त्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात तीन टोळ्यांवर ‘मोक्का’

मिळालेली माहिती अशी, काही अंतरावर गेल्यावर त्या आरोपीने मुलीला वाटेत थांबवून जुंदला गावाचा पत्ता विचारण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने मुलीला पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर पांघरूण टाकले. मुलीने हिंमत दाखवून स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला यश आले नाही. यानंतर मुलीने आरोपीचा हात चावून आवाज करत स्वत:ची सुटका केली.

मुलीचा आवाज ऐकून आजुबाजूला असणाऱ्या लोकांनी धाव घेतली. घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या आरोपीला पकडले. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी आरोपीला बेदम मारहाण केली, आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला अटक केली.

नातेवाइकांनी सदर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता, आरोपी चाइल्ड लिफ्टर देखील असू शकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुंदला येथे कुटुंबासह राहतो तो मजुरीचे काम करतो. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

'आरोपी श्रावण हा मूळचा बिहारमधील समस्तीपूरचा आहे. आरोपीचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. तो जुंदला येथे आपल्या कुटुंबासह राहतो तो मजूर म्हणून काम करतो. घटनास्थळी लोकांनी आरोपींकडून मुलीला ताब्यात घेतले. आरोपविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती सदर पोलीस स्टेशनचे एसएचओ मनोज वर्मा यांनी दिली. 

मुलगी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होते. शाळा असो की गाव, जेव्हा कधी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा ती तिथे पोहोचते आणि स्वतः रोपटे लावते. यासोबतच ती लोकांना पर्यावरण रक्षणाबाबतही जागरूक करते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

Web Title: brave girl overpowers on kidnapper in karnal of haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.