Bribe Case :दुग्ध व्यवसाय विकास अधिकारीला २५ हजाराची लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:37 PM2021-08-03T21:37:39+5:302021-08-03T21:39:44+5:30
Bribe Case: एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनीत तक्रारदार यांच्या घर आणि दुकानाविरोधात कोणीतरी तक्रार केली.
मुंबई : दुग्ध व्यवसाय विकास विभागातील आयुक्त व दुग्धव्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य वरळी यांच्या कार्यालयातील उपमुख्य दक्षता अधिकारी उदास दाजी तुळसे यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी अटक केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्या आर्थिक व्यवहाराची कुंडली तपासण्यात येत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनीत तक्रारदार यांच्या घर आणि दुकानाविरोधात कोणीतरी तक्रार केली. याच तक्रारीवरून घर आणि दुकान अनधिकृत असल्याचे सांगून तुळसेने कारवाईची भिती घातली. कारवाई करू नये यासाठी २५ हजार रूपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी ३० जुलै रोजी एसीबीकड़े धाव घेतली. ठरल्याप्रमाणे त्यांनी पैसे देण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी एसीबीने सापळा रचून तुळसेला २५ हजार रूपयांची लाच घेताना अटक केली.