आजारी आरोपीला भेटण्यासाठी मागितली चक्क २० हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 09:03 AM2019-02-16T09:03:56+5:302019-02-16T09:04:12+5:30

तुरुंगात असलेले कैदी, आरोपींना भेटण्यासाठी कारागृह पोलीस पैसे घेत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. पण, नातेवाईकांच्या भेटीसाठी आसुरलेले लोक त्यांची मागणी निमुटपणे मान्य करुन पैसे देतात.

A bribe of Rs. 20,000 was asked to meet the sick accused | आजारी आरोपीला भेटण्यासाठी मागितली चक्क २० हजारांची लाच

आजारी आरोपीला भेटण्यासाठी मागितली चक्क २० हजारांची लाच

Next

पुणे  - तुरुंगात असलेले कैदी, आरोपींना भेटण्यासाठी कारागृह पोलीस पैसे घेत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. पण, नातेवाईकांच्या भेटीसाठी आसुरलेले लोक त्यांची मागणी निमुटपणे मान्य करुन पैसे देतात. पण, त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलिसांनी कडी केली. आजारी असल्याने ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असलेल्या मुलाला भेटू देण्यासाठी दोघा पोलिसांनी वडिलांकडे चक्क २० हजार रुपयांची लाच मागितली. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री सापळा रचून या दोघा पोलिसांना रंगेहाथ पकडले. स्वप्नील भीमराव भद्रे (वय ३०, रा़ विश्रांतवाडी पोलीस लाईन), अनोश आगस्टिन गायकवाड (वय २४, रा़ कनक अपार्टमेंट, दौंड) अशी पोलीस मुख्यालयाच्या पोलीस शिपायांची नावे आहेत.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा शुक्रराज हा येरवडा तुरुंगात कोठडीमध्ये आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तुुरुंगात उपोषण सुरु केले आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी स्वप्नील भद्रे आणि अनोश सबस्तीन यांची नेमणूक केली आहे. त्याच्या वडिलांनी मुलाला भेटू देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी मुलाला भेटायचे असेल तर २० हजार रुपयांची मागणी केली. 

 त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी रात्री ससून रुग्णालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेताना स्वप्नील भद्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला मदत व प्रोत्साहन दिले म्हणून अनोश गायकवाड यालाही पकडण्यात आले आहे.

Web Title: A bribe of Rs. 20,000 was asked to meet the sick accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.