ब्रिटिश नागरिकाची जुहूतील आलिशान हॉटेलमधून झाली बॅग गायब 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:08 PM2019-01-02T17:08:03+5:302019-01-02T17:25:35+5:30

जुहूतील सी प्रिन्सेस या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. गीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली असून या बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

British citizens disappeared from a luxury hotel in Juhu | ब्रिटिश नागरिकाची जुहूतील आलिशान हॉटेलमधून झाली बॅग गायब 

ब्रिटिश नागरिकाची जुहूतील आलिशान हॉटेलमधून झाली बॅग गायब 

Next
ठळक मुद्देगीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्यायाप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

मुंबई - जुहू परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलातून भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांची बॅग चोरीला गेल्याची धक्कादायक बाबा घडली आहे. जुहूतील सी प्रिन्सेस या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. गीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली असून या बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

गीता पटेल (वय ६१) या युकेमधून मुंबईत नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आल्या होत्या. त्या युकेहून गुजरातला आल्या होत्या. गुजरातहून आपल्या नातलगांसह मुंबईत आल्या. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी त्यांनी जुहूतील सी प्रिन्सेस हॉटेलात रूम बुक केली होती. त्यानुसार त्या हॉटेलमध्ये आल्या. त्यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर त्यांच्याकडील सामान घेऊन तुम्ही आत जा, आम्ही सामान घेऊन येतो असे सांगण्यात आले. दरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केली जाणारी तपासणी देखील सर्वांची करण्यात आली. नंतर गीता पटेल यांना त्यांची बॅग गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यात महागडे कपडे आणि काही दागिने, आयपॅड होता. याबाबत हॉटेलातील संबंधित व्यक्तीस माहिती देऊन विचारपूस केली असता त्यांनी सीसीटीव्ही पाहणी केली. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. शेवटी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: British citizens disappeared from a luxury hotel in Juhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.