बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या भावांना कोर्टाचा दणका, २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा 

By पूनम अपराज | Published: February 3, 2021 09:30 PM2021-02-03T21:30:20+5:302021-02-03T21:31:07+5:30

Gangrape : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन चुलत भावांना २०-२० वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्या प्रत्येकाला ५० हजार रुपये दंड ठोठावला.

Brothers sentenced to 20 years in prison for gang-raping sister | बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या भावांना कोर्टाचा दणका, २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा 

बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या भावांना कोर्टाचा दणका, २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा 

Next
ठळक मुद्देन्यायालयाने मंगळवारी सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या लवलेश आणि सुरेश या दोन चुलत भावांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि प्रत्येकी 50-50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील कोर्टाने एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन चुलत भावांना २०-२० वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्या प्रत्येकाला ५० हजार रुपये दंड ठोठावला.

पॉक्सो कोर्टाचे विशेष सरकारी वकील (एडीजीसी) रामसुपाल सिंग यांनी बुधवारी सांगितले की, अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचे (पीपो) विशेष न्यायाधीश पवन कुमार शर्मा यांच्या न्यायालयाने मंगळवारी सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या लवलेश आणि सुरेश या दोन चुलत भावांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि प्रत्येकी 50-50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
 

Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

चेहरे आले समोर ! दिल्लीत हिंसाचार माजविणाऱ्या १२ जणांचे फोटो दिल्ली पोलिसांनी केले प्रसिद्ध 

 

एडीजीसीने सांगितले की, दंडाच्या रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की, 13 जानेवारी, 2017 रोजी बिसांडा पोलिस स्टेशन परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि त्यावेळी ती 17 वर्षांची होती. पोलिसांनी 22 जानेवारीला या दोघांना पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली. 

Web Title: Brothers sentenced to 20 years in prison for gang-raping sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.