आई-लेकानं मिळून केली बापाची क्रूर हत्या; पहिल्यांदा गळा चिरला, डोळे फोडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 01:42 PM2020-06-11T13:42:40+5:302020-06-11T13:44:18+5:30
पत्नी चरणजीत कौरने मुलगा जतिंदर सिंह यांच्या मदतीने ७० वर्षीय पती शाम सिंह यांची हत्या केली आहे. पत्नीने पती शाम सिंह यांचे हात पकडले तर मुलगा जतिंदरने स्वत:च्या वडिलांचा गळा चिरला आणि पोटात चाकूने वार केले.
लुधियाना – पंजाबमध्ये मोठी ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका पत्नीने आपल्या मुलाला सोबत घेऊन मध्यरात्री तिच्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. इतकचं नाही तर सकाळ झाल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना फोन करुन आम्ही म्हाताऱ्याला मारुन टाकलं असं कळवलं. लुधियाना शहरात घडलेल्या या घटनेने बुधवारी रात्री परिसरात खळबळ माजली.
याठिकाणी पत्नी चरणजीत कौरने मुलगा जतिंदर सिंह यांच्या मदतीने ७० वर्षीय पती शाम सिंह यांची हत्या केली आहे. पत्नीने पती शाम सिंह यांचे हात पकडले तर मुलगा जतिंदरने स्वत:च्या वडिलांचा गळा चिरला आणि पोटात चाकूने वार केले. मृत्यूनंतरही या दोघांनी शाम सिंह यांना चाकू भोसकून त्यांचे डोळे फोडले. त्यानंतर आई-मुलगा शाम सिंह यांच्या मृतदेहाशेजारी बसून जेवण केलं आणि रात्रभर बसून राहिले. सकाळी उठून या दोघांनी नातेवाईकांना फोन करुन हत्या केल्याची बातमी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक शाम सिंहला दारुचं व्यसन होतं, तो पत्नी आणि मुलासोबत पैशांच्या कारणावरुन रोज भांडण करत असे, काही शेजाऱ्यांनी सांगितले की, शाम सिंह त्याच्या पत्नी आणि मुलाला मारहाणही करत होता. या प्रकाराशी वैतागून पत्नी आणि मुलाने शाम सिंह यांची हत्या केली. तर काहींचे म्हणणं आहे की, मुलगा आणि पत्नी या दोघांची मानसिक स्थिती ठीक नाही.
शाम सिंह यांचा भाऊ सतवंत सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांच्या भावाच्या घरी भांडण झालं होतं. मुलगा आणि वहिनी माझ्या भावाला पसंत करत नव्हते. मृतक शाम सिंह हे आयएफएफसीओमधून जीएम पदावरुन निवृत्त झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात आई-मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता आरोपी जतिंदर सिंहने सांगितले की, मीच माझ्या वडिलांची हत्या केली आहे. मी का त्यांची हत्या केली मला माहित नाही, पण मला याचा पश्चाताप नाही. पोलीस या दोघांची चौकशी करत असून हत्येचं खरं कारण शोधून काढत आहे.
एसएचओ मधु बाला यांच्या माहितीनुसार शाम सिंह यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाचा चेहरा, डोके आणि डोळ्यांवर गंभीर निशाण आहेत. हत्येचं खरं कारण अद्याप माहिती पडले नाही. पोस्टमोर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण घटनेचा खुलासा होईल असं त्यांनी सांगितले.