भिवंडीत सव्वा कोटी रुपयांच्या मौलवान धातूची घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 09:42 PM2020-11-13T21:42:08+5:302020-11-13T21:42:22+5:30
Crime News: बारा तासात मुद्देमाल जप्त करण्यात नारपोली पोलिसांना यश; तीन आरोपींना अटक
भिवंडी ( दि. १३ ) भिवंडी पोलीस उपायुक्त क्षेत्रातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर घरफोडीच्या घटना घडत असतानाच नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील वळगाव येथील गोदमातून घरफोडी करून चोरीस गेलेल्या १ कोटी, ३५ लाख, १ हजार ९१२ रुपयांचा १२. ३ टन वजनाचा मौल्यवान धातूची घरफोडी केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या बारा तासात या घरफोडीतील तीन आरोपींना अटक करण्यात नारपोली पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकाने यश मिळविले असल्याची माहिती शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे .
वळगाव येथील माँ पद्मावती कॉम्प्लेक्स येथील नोंनफेरस मेटल या कंपनीचे गोदाम असून या गोदामात ८ नोव्हेंबरच्या रात्री शटरचे लॉक तोडून गोदामातील टंगस्टन कार्बाईड या नावाचे १२.३ टन वजनाचे मौल्यवान धातू चोरीस गेल्याचे मालक निखिल नरेंद्र दुबल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती . यानंतर पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण ,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे , पोलीस निरीक्षक गुन्हे रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे पथकातील पो उप निरीक्षक पुष्पराज सुर्वे ,पो हवा. अशोक बोडके ,पो.ना.राजेश गावडे,लक्ष्मण सहारे, पो.शि.सुनील शिंदे,प्रवीण सोनवणे ,पारस बाविस्कर, विजय ताठे या पथकाने गुप्त बतमीदाराच्या माध्यमातून मोबाईल चा तांत्रिक तपास करीत अवघ्या बारा तासात राहनाळ येथून या गोदामात काम करणारा सोहनसिंग राजपूत ,व त्याचे दोन साथीदार भंगार व्यावसायिक तारासिंह भैरवसिंह परमार , हिरासिंह भैरवसिंह परमार या दोघा भावांना राहनाळ येथून अशा प्रकारे एकूण तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची घरफोडी केल्याचे कबुल केले असून त्यांच्या कडून चोरी केलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून या गुन्ह्यातील तीनही आरोपींना न्यायालयाने १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असून तपासी अधिकारी पुष्पराज सुर्वे हे या आरोपीं कडे या व्यतिरिक्त काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.